श्री. सुधाकर बडगुजर यांना – कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार जाहीर – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

अभिनंदन !! अभिनंदन !! अभिनंदन !!

आपल्या नाशिक नगरीतील मा. श्री. सुधाकर बडगुजर यांना कोरोना काळातील विशेष कामगिरीबद्दल नाशिक सिटीझन फोरम तर्फे सन २०२१ वर्षीच्या “कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार” जाहीर केले आहे. या पुरस्कार वितरण सोहळा हा दि. २०/१२/२१ रोजी सातपूर येथे नाईस सभागृह येथे सायंकाळी ५:३० ता. होणार आहे.जेष्ठ उद्योजक व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे व विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे हेही उपस्थित राहणार आहे. सोहळा हा मर्यादित उपस्थितीत होणार आहे.


नाशिक सिटीझन फोरम चे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष श्री. हेमंत राठी यांनी माहिती दिली व हा सोहळा आपण नाशिक सिटीझन फोरमच्या फेसबुक पेजवर प्रसारण होणार आहे. त्यासोबत अजुन पाच नगरसेवक श्री. जगदीश पाटील, श्री. जगदीश पवार, श्रीमती. वर्षा भालेराव, श्रीमती. स्वाती भामरे व श्रीमती. छाया देवांग यांचाही सन्मान केला जाणार आहे.
श्री. सुधाकर बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून आपले हार्दिक अभिनंदन 🌹🌹

2 Comments

  1. नाशिक नगरीचे पुरस्कार प्राप्त नगरसेवक श्री सुधाकर भाऊ यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन पुढील वाटचाल साठी खूप शुभेच्छा💐🎉👌

Leave a Reply

Your email address will not be published.


*