बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव तर्फे बडगुजर समाज सांस्कृतिक, कला महोत्सवाचे आयोजन – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव

♦️ नमस्कार 🙏🏻

आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व बडगुजर समाज बांधवांना सुचित करण्यास आनंद होतो की, बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव तर्फे बडगुजर समाज सांस्कृतिक, कला महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी जळगांव येथील रोटरी क्लब हॉल(मायादेवी मंदिराजवळ,महाबळ) येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

या सामाजिक महोत्सवात आपले कलागुण सादर करण्याची संधी बडगुजर विद्या प्रसारक मंडळ आपणास उपलब्ध करून देत आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे.

🔹 या सांस्कृतिक कला महोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यात

💃🏼🕺🏼👉 डान्स – सोलो डान्स, ग्रुप डान्स

➡️ एकांकिका & स्टँड अप कॉमेडी शो,मिमिक्री,

➡️ गीत गायन, इंस्ट्रुमेंटल जसे तबला वादन ,बासरी वादन, हार्मोनियम, गिटार, संतूर, इतर तत्सम वाद्य इत्यादी

अशा विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आपण या महोत्सवात घेणार आहोत. आपल्यात असलेले कलागुण हे समाजबांधवांसमोर सादर करण्याची संधी व योग्य कलागुणांना व्यासपीठ बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव आपणांस या कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करून देत आहे.
🔹 कार्यक्रमाची वेळ- दुपारी १:३० वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत
🔹 या कार्यक्रमात कुठल्याही वयोमर्यादेची बंधन ठेवण्यात आलेले नाही.

🔹 या स्पर्धेत वेगवेगळे गट असतील अशा गटातून विजयी होणाऱ्यांना बक्षिसे पण दिले जातील.
🔹 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी google form भरणे आवश्यक आहे. त्याची लिंक खाली दिली आहे
🔸मराठी लिंक-

https://forms.gle/xAAtpibCrQHV8yTi8


🔹 फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर आहे.
🔹 आलेल्या प्रवेशिकांमधून योग्य कार्यक्रमांची निवड समितीमार्फत करण्यात येईल.
🔹 समितीचा निर्णय अंतिम राहील
🔹प्रवेश निश्चत झालेल्या स्पर्धकांना २५१ रुपये फी भरावी लागेल.
🔹स्पर्धकाने लागणारे साहित्य स्वतः आणावे
🔹 गीत गायन स्पर्धकांनी sound ट्रॅक मोबाईल मध्ये घेऊन यावा.
🔹कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली आहे.
👫🏻 चला तर मग, लागा तयारीला.

आपल्यात असलेले कलागुण भव्य अशा रंगमंचावर सादर करण्याला, आपल्यात असलेल्या कलागुणांचे कौतुक करायला आपल्या समोर आहेत आपले बडगुजर समाज बांधव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*