पुणे येथील बडगुजर समाजबांधवांचा समाजातील उभरता सितारा रोहित बडगुजर याने प्रोडक्शन मेनेजर म्हणून काम पाहिलेल्या जयंती या मराठी सिनेमास भरभरून प्रतिसाद श्री. दिनेश बडगुजर हडपसर

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

नमस्कार!
जयंती’ सिनेमाच्या निमित्ताने आज हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहचवत आहे! आपण अनेक महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करत असतो परंतु त्यामागील सामाजिक-राजकीय विरोधाभास आपल्याला काही नवा नाही. नेमक्या याच विषयावर पण वेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ (Jayanti) हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर १२ नोव्हेंबर २०२१ पासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे आणि आजही काही ठिकाणी हाऊसफुल गर्दी खेचतो आहे.


जयंती हा सिनेमा जेव्हा बनवण्याचा विचार झाला तेव्हापासून चित्रपटासोबत जोडला गेलेला हुशार कार्यकुशल रोहित बडगुजर या चित्रपटासाठी निर्मिती प्रमुख म्हणून पुढे आला आणि प्रोजेक्टसाठी लागणारे कलाकार, तंत्रज्ञ,लोकेशन्स आणि इतर सर्वच गोष्टीसाठी तो अहोरात्र धडपडत राहिला आणि त्या योग्य वेळेत पाठपुरावा करत उपलब्ध करून दिल्या, तो हाच विद्यार्थी आहे ज्याला २०१५ साली बडगुजर समाजाकडून दिला जाणारा विशेष गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं होतं. याच समाजातील लोकांना नागपूरमध्ये एकत्र करून त्याने चित्रपटासाठी मोलाची जबाबदारीही पार पाडली तसेच अनेक आव्हाने स्वीकारत हा सिनेमा पूर्णत्वास नेला. मोठ्या पडद्यावर एक चांगला सामाजिक विषय येत असल्यामुळे तो निर्मिती प्रमुख बनून चित्रपटासाठी खंबीरपणे उभा राहिला. आज तो त्याच्या समाजाला आव्हान करत आहे, सर्वांनी एकत्र येऊन या सामाजिक विषयावरील चित्रपटास समाजानेच उचलून धरलं पाहिजे. जयंती हा रोहितचा पहिलाच चित्रपट अनुभव असल्यामुळे त्यालाही चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघायला हवा. याची धमाकेदार सुरुवात तर झालेली आहेच परंतु लॉकडाऊननंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा समाजातील लोकांनी आपलासा करायला हवा. त्यासाठी दिनांक २४/११/२०२१ रोजी पुणे येथील राहुल सिनेमा येथे सायंकाळी ७.०० वाजता निर्मिती प्रमुख असलेले रोहीत बडगुजर स्वतः आणि चित्रपटातील अभिनेत्री अंजली जोगळेकर उपस्थित होते तर चित्रपट संपल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला श्री. लोकेश बडगुजर पुणे यांनी व जयंती या सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक श्री. शैलेश नरवाडे सर यांचा सत्कार करतांना बडगुजर समाज पुणे विभागातील समाजबांधव

यावेळी पुणे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री. अनिल बडगुजर, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. भगवान बडगुजर, अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे कार्यकारिणी सदस्य श्री. लोकेश कोतवाल, पुणे येथील समाजबांधव श्री. दिनेश बडगुजर आदी उपस्थित होते. या सर्वांशी श्री. शैलेश जी व सिनेमातील हिरो रूतुराज वानखेडे यांनी बडगुजर समाजबांधवांशी संवाद साधला व आभारही मानले.


यासाठी :
संवाद ठेवूयात- संपर्कात राहूयात

2 Comments

  1. अभिनंदन करतो.एक नवीन वाटचाल.आपले करिअर आणि चित्रपटास शूभेछा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*