बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. बापू किसन शेठ बडगुजर यांनी नुकतीच अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे माजी अध्यक्ष आप्पासो श्री. उमेश जी करोडपती यांची त्यांच्या पारोळा येथील निवासस्थानी जाऊन, बडगुजर विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारणी सदस्य सोबत सदीच्छा भेट घेतली याप्रसंगी श्री. बापू शेठ यांच्यासोबत बडगुजर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. लीलाधर दत्तात्रय बडगुजर, उपाध्यक्ष व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे नियोजित अध्यक्ष श्री. सुरेश शेठ महाले, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे नवनिर्वाचित खजिनदार श्री. पी. डी. बडगुजर सर, जळगांव येथील उद्योजक श्री. राजेंद्र दत्तात्रय पवार तसेच श्री. विकास शेठ पुंडलिक बडगुजर आणि रचना डेवलपर आणि बिल्डरचे मालक श्री. दत्तात्रय निंबा बडगुजर हेही याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळीआप्पासाहेब उमेशजी करोडपती यांच्या परिवाराच्या वतीने श्री. बापूसाहेब बडगुजर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पासो. यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंगलाताई, श्री.चेतन बडगुजर, श्री.संकेत बडगुजर हेही उपस्थित होते.
बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव च्या वतीने ही श्री. बापूराव यांचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आप्पासो. उमेशजी करोडपती यांनी मंडळ चालवण्याबाबत आणि प्रगती करण्याबाबत श्री. बापूसाहेब यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले व जळगाव विद्या प्रसारक मंडळाने ज्याप्रकारे विकासाची कामे केली त्याच प्रमाणे आपण आपल्या मंडळांची विकास कामे ही सर्वांना सोबत घेऊन, कुठलाही द्वेष मनात न बाळगता काम केले तर सर्व समाज आपल्या पाठीशी उभा राहील असं आश्वासनही श्री. आप्पासाहेबांनी बापूसाहेब यांना दिले. सत्कारा बद्दल श्री. बापूसाहेबांनी यावेळी आभार व्यक्त केले व आपण सर्व खान्देश वासियांनी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळास सहकार्य करावे अशी विनंती केली.
तसेच नुकताच जळगाव येथे झालेल्या शिवपुत्र संभाजीराजे प्रतिष्ठान तर्फे सौ.मंगलाताईंना कोरोनायोध्दा पुरस्कार देण्यात आला, त्या निमीत्ताने सौ.मंगलाताईंचा सत्कार मुंबई मंडळाच्या वतीने श्री.बापू साहेबांनी केला. मुंबई आणि खान्देश विभागाची एक घट्ट नाळ आहे. खान्देशातूनच बरेचसे समाजबांधव मुंबई विभागात गेलेले आहेत. असे विशेष नमूद करत आपण सर्व एकच आहोत यात गांव किंवा विभाग हे नाममात्र आहेत असे मत श्री. बापू शेठ यांनी व्यक्त केले.
तसेच मुंबई विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी बडगुजर दर्शन च्या दिवाळी अंकाविषयी सर्वांना माहिती दिली व योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन ही केले.
मुंबई आणि खान्देश विभागाची एक घट्ट नाळ आहे. खान्देशातूनच बरेचसे समाजबांधव मुंबई विभागात गेलेले आहेत. असे विशेष नमूद करत आपण सर्व एकच आहोत यात गांव किंवा विभाग हे नाममात्र आहेत असे मत श्री. बापू शेठ यांनी व्यक्त केले.
Leave a Reply