अयुषशास्रातील जागतिक संघटना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी Aima खांदेश गौरव अवॉर्ड कार्यक्रम संपन्न झाला…
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने जळगाव येथे पालक मंत्री ना..श्री.गुलाबराव पाटील,मा.मंत्री श्री. गुलाबराव देवकर, खासदार श्री.उन्मेश दादा पाटील,महापौर सौ.जयश्री ताई महाजन, यांच्या हस्ते वैद्यकीय शास्रातील चिकित्सकांचा योगदानाची दखल घेत खांदेश गौरव अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला..
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश जी कराळे, उपाध्यक्ष डॉ.नितीन राजे पाटील,डॉ.राकेश झोपे, डॉ.हर्षल बोरोले,डॉ.सौ.लिना बोरोले,डॉ.विरेंद्रसिंग गिरासे व सर्व राष्ट्रीय व राज्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शास्रतील व कोरोनाच्या काळातील योगदानाबद्दल खान्देशातील चिकित्सकांना सन्मान देऊन गौरविण्यात आले,यात खांदेशातून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने डॉ.बाळू बडगुजर यांच्या कार्याची दखल घेत अवॉर्ड जाहीर झाला होता डॉ.बाळू अभिमन्यू बडगुजर हे मागील 15 वर्ष आदिवासी भागात खाजगी वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत याच माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेस आरोग्य विषयक मदतीचा हात देत आधार ठरत असतात या सर्व कार्याची दखल घेत त्यांना आज 31 ऑक्टोबर रोजी खांदेश गौरव अवॉर्ड देत जळगाव येथे सिल्वर पॅलेस येथे सन्मानित करीत गौरविण्यात आले,प्रसंगी खांदेश उत्तर महाराष्ट्र आयुष मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी व प्रॅक्टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री डॉ. बाळू अभिमन्यू बडगुजर विरदेल यांना खान्देश गौरव सन्मानित बद्दल खूप खूप अभिनंदन💐💐🎉🎉👌
धन्यवाद सर
श्री बाळू अभिमन्यू बडगुजर यांना खान्देश गौरव सन्मानित झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
धन्यवाद सर