रांगोळीतुन साकारली दुर्गामातेचे चित्र – डॉ. दिलीप धोंडू बडगुजर अमरावती

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

पिंपळकोठे ह.मु.जळगांव येथील श्री. बापू ओंकार बडगुजर यांची सुनबाई, श्री. ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या पत्नी सौ. वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर यांनी मातेची उपासना ही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार करुन, आपल्या आवडत्या छंदातून नवरात्रोत्सवा निमित्त आपल्या कला कौशल्याने रांगोळीतुन साकारली दुर्गामातेचे चित्र, हे साकारणे किंवा काढणे तेवढे सोपे नव्हते त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली, आपल्या छंदाला आकार देत व मनात प्रतिबिंब रेखाटले व आपल्या स्टेट बँक कॉलनी जळगांव राहत्या घरी ६ बाय ४ फूट आकारात पोट्रेट रांगोळीतुन दुर्गामातेचे चित्र रेखाटले.


यासाठी ते आपले दररोज चे दैनंदिन काम करून सलग रोज तीन तास वेळ काढून सहा दिवसांत पूर्ण केले. ते पूर्ण करण्यासाठी त्यांची दोन्ही मुले चि.विपुल, चि. निखिल व पती ज्ञानेश्वर बडगुजर यांनीही मदत केली. यासाठी रांगोळीत योग्य रंग छटा दाखवण्यासाठी वेग वेगळे लेक चा रंगाचा वापर केला. त्यांना तब्बल १८ तास लागले व ७ किलो रांगोळी लागली दुर्गा मातेचे चित्र पूर्ण करायला.

अप्रतिम रांगोळी साकारली व रांगोळी पाहण्यासाठी नातेवाईक व परीसरातील लोक पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत. आपण खाली दिलेल्या लिंक वर अशी व्हिडीओ बघु शकतात व चॅनेला Like, Subscribe व Share करू शकतात.

https://youtu.be/aia9R08K21A

सौ. वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर – ७८७५९६९९३३, ९४२३१ ८५२९१ ‘श्रीआज्ञा’ प्लॉट.नं. ४६ अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ जवळ जळगाव.

2 Comments

  1. चि सौ वैशाली ताई
    यांची सुंदर, अजोड कलाकृती!

    जय माता दी!

Leave a Reply

Your email address will not be published.


*