नाविन्यपूर्ण उपक्रमशील आणि कला प्रेमी शिक्षिका, ठाणे वैभव आदर्श शिक्षक पुरस्कार
सौ.राजश्री संजय बडगुजर आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ अभिनंदन!
मांडळ,ह.मु.ठाकुर्ली-डोंबिवली येथील आदर्श शिक्षक, विविध पुरस्काराचे मानकरी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक कविता रचयिते, ग.वि.खाडे विद्यालय एज्युकेशन सो.शहापूर से.नि.कला शिक्षक – श्री.शालिग्राम धनजी बडगुजर यांची कन्या व भोकर (जळगांव) ह.मु.उल्हासनगर १ येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, म.रा.प.मं महाराष्ट्र राज्य डेपो से.नि.अधिक्षक श्री.शांताराम सि.भिलमाळा यांची सूनबाई अर्थात सौ. राजश्री संजय बडगुजर यांना आमदार मा.श्री.संजय केळकर ठाणे व संचालक, समर्थ अॅडव्हटायझर्स श्री.मच्छिंद्र युवराज कांबळे, संपादक: श्री.मिलिंद वरेंद्र वल्लाड (ठाणे वैभव वृत्तपत्र) यांचे कडून दि.०९ आक्टोबर २०२१.आदर्श शिक्षक पुरस्कार, सन्मान चिन्ह, ट्राफी देवून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पून्हा एक बडगुजर समाजात शिरपेचात मानाचा मुजरा रोवला आहे.
सौ.राजश्री सं बडगुजर ह्या जि.प. शाळा गोपाळपाडा केंद्र अजनुप ता. शहापूर येथे सहशिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत विविध स्थरावर प्रशिक्षण देण्यासाठी सुगम कर्ता म्हणून सर्वांना ज्ञात असणाऱ्या सौ.राजश्री बडगुजर मॅडम यांच्या ज्ञानदानाच्या कार्याची सुरुवात २००४ साली शहापूर तालुक्यातील जि.प.शाळा खराडे येथून झाली तद्नंतर जि.प.शाळा बेडीसगांव व आता जि.प.शाळा गोपाळपाडा असा शैक्षणिक ज्ञानदानाचा प्रवास सुरु आहे.
विविध प्रकारची चित्रे,ओरिगामी वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांचे अवधान विचलीत न होऊ देता, मनोरंजक रित्या शिक्षण देण्यासाठी सौ.राजश्री बडगुजर मॅडम यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. ‘मिना-राजू मंच’, ‘मेलजोल’, ‘राज्यस्तरीय योग प्रशिक्षण’‘सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यमापन’‚ ‘मूल्यवर्धन’,‘क्रिडा-प्रबोधिनी निवड चाचणी शिबीर’, (तालुकास्तर व जिल्हास्तर) या सारख्या शैक्षणिक उपक्रमात सुगम कर्ता म्हणून, प्रेरक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
जिल्हा परिषद शाळा खराडे येथे कार्यरत असताना लोकसहभागातून शालेय भौतिक सुविधा उपलब्ध करुन देवून गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विषेश प्रयत्न केले आहेत.याच काळातील उल्लेखनीय कामगिरी म्हणजे राज्यस्तरीय आंम्ही साधक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे (जिल्हा ठाणे २०१७ /१८) मध्ये कला कार्यानुभव या विषयांचा अध्यन-अध्यापनात वापर या धर्तीवर स्टाॅल लावून अनेक पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक, बंधू-भगिनींना चित्रकला व हस्तकलाचे महत्त्व पटवून दिले.जि.प.शाळा बेडीसगांव या शाळेत असताना ‘इंग्रजी विषयावर आधारित विविध नाविन्यपूर्ण उपक्रम’ राबवले आहेत. त्याच प्रमाणे त्यांची जि.प. शाळा गोपाळपाडा येथे कार्यरत असताना मूल्यवर्धन प्रेरक म्हणून पोस्टर्स निर्मिती स्पर्धेत उत्कृष्ट पोस्टर्स निर्मिती म्हणून निवड करण्यात आली. मी आणि मूल्यवर्धन या पुस्तकात नाही थांबायचं…. फक्त जिंकायचं…. हा त्यांचा अनुभवपर लेख प्रसिद्ध आहे. सौ.राजश्री सं. बडगुजर मॅडम यांना ‘महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती’तर्फे राज्य स्तरीय आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच उत्कृष्ट सुत्रसंचालिका म्हणून शहापूर तालुक्यात त्यांची ख्याती आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भावविश्व विकसित करुन त्यांना मनोरंजनातून शिक्षण देणाऱ्या कला प्रेमी सौ.राजश्री सं. बडगुजर मॅडम यांना अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य, गुजरात, म.प्रदेश, जळगांव, चाळीसगांव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे, मराठवाडा, औरंगाबाद, विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे, सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत, सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्था आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
शब्दांकन : श्री.सी.पी.बडगुजर, ऐरोली नवी मुंबई. मो.9833132881.
शिक्षण क्षेत्रातील नावीन्य पूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळेल स्वनिर्मित प्रयोग वाखाणण्याजोगी आहेत नारिषक्तीच शैक्षणिक रूप अप्रतिम सौ राजश्री बडगुजर
मनपूर्वक अभिनंदन!!!!
हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन,
Congratulations & Excellent to Sau.Rajshri Mam & Family Keep it up💐💐👌👍