जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या श्रीमती. सुरेखा संजयशेठ बडगुजर या पंचायत समिती धुळे फागणे गणातून प्रचंड मतांनी विजयी – श्री. योगेश जाधव सर, भाटपुरा/चोपडा

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या श्रीमती. सुरेखा संजयशेठ बडगुजर या पंचायत समिती धुळे फागणे गणातून प्रचंड मतांनी विजयी झाल्या.
त्यांना श्री. मनोहर बन्सीलाल बडगुजर व त्यांचे चिरंजीव श्री. शशिकांत (भैय्या भाऊ) मनोहर बडगुजर यांनी विशेष मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन केलं. श्री. शशिकांत भैय्या व चि. विपुल यांच्या फागणे, वणी, मळाणे व आर्णी या गावातील सामाजिक कार्यामुळे श्रीमती. सुरेखा ताई यांना निवडून येण्यास खूप मदत झाली. संख्येने अल्पसंख्य असलेल्या बडगुजर समाजातील असूनही लोकशाहीतील संख्याबळाचं गणित त्यांनी आपल्या समाजभानाने जमवत विजयाची मोहोर उमटवली. त्याबदद्ल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. अनेक समाज विभूतींनी त्यांचं विशेष अभिनंदनदेखील केलं आहे. त्यांचे व्याही डॉ. मनोहरशेठ जाधव व सौ. विद्याबाई जाधव (ह.मु. भाटपुरा ता. शिरपूर) यांनीसुद्धा त्यांच्या धुळे येथील निवासस्थानी जाऊन श्रीमती सुरेखाताईंची भेट घेतली आणि शाल, श्रीफळ, साडी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व मनापासून अभिनंदन केले.

श्रीमती. सुरेखा संजयशेठ बडगुजर

श्रीमती सुरेखा ताई यांनी धुळे जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. त्यांचे पती. कै. संजय बन्सीलाल बडगुजर हे फागणे गावाचे माजी सरपंच होते त्यानंतर आरोग्य खात्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून जवळपास २५ वर्ष सेवा त्यांनी केली होती तसेच धुळे येथील आरोग्य विभागाच्या सहकारी पतसंस्थेत चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला होता. काळाच्या दुर्दैवी झडपेने कै. संजयशेठ यांना त्यांच्या कुटुंबापासून हिरावून नेले तरीही श्रीमती सुरेखाताई डगमगल्या किंवा खचल्या नाहीत. त्यांचं हे यश समाजातील सर्व स्रीयांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल हे निःशंक खरे आहे.

सामाजिक कार्याचा हा वारसा कायम राखत श्रीमती. सुरेखा ताई बडगुजर ह्या बडगुजर समाजातील पहिल्या महिला पंचायत समिती सदस्य ठरल्या आहेत. यांना पुढील वाटचालीसाठी

बडगुजर प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन टिम व समस्त बडगुजर समाजाकडून खूप खूप शुभेच्छा व त्यांनी पुढे असेच समाजकार्य सुरू ठेवावे ही सदिच्छा.

2 Comments

  1. Congratulations to Smt.Surekhatai Sanjay Badgujar & Family 💐💐👌

  2. सुरेखाताईचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published.


*