सायकलस्वार संभाजी बडगुजर यांची २०० किलोमीटर सायकलिंग ‘ब्रेव्हे’ स्पर्धेत उत्तम कामगिरी….🚴

सायकलस्वार संभाजी बडगुजर
      फ्रान्स येथील 'ऑडक्स सायकलिंग क्लब' द्वारे संपूर्ण जगात विविध देशांमध्ये राँदेनिअर्स ब्रेव्हेट (BRM) साहसी सायकलिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. भारतात देखील 'ऑडक्स इंडिया राँदेनिअर्स' क्लबद्वारे अश्या प्रकारच्या सायकलिंग स्पर्धा मोठमोठ्या निवडक शहरांमध्ये घेण्यात येतात. BRM ही लांब अंतराची सायकल स्पर्धा असून नियोजित वेळेत पूर्ण करावी लागते. BRM स्पर्धा संपूर्ण स्वतःच्या हिमतीवर तसेच कुणाचीही मदत न घेता पूर्ण करावी लागते.

          BRM स्पर्धेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नागपूर राँदेनिअर्स क्लबच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी उपराजधानीत झिरो माईल्स पासून मध्यप्रदेशातील पीपलपाणी व तेथून परत नागपूर झिरो माईल्स पर्यंत २०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विविध शहरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच नवोदित २४० सायकलपटूंनी सहभाग घेतला. 

            चंद्रपूर येथे महानिर्मिती मध्ये कार्यरत सहाय्यक अभियंता श्री संभाजी बडगुजर यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन, निर्धारित १३.३० तासाच्या वेळेआधी ८ तास १९ मिनीटांत २०० किलोमीटर अंतर पूर्ण करत उत्कृष्ट कामगिरी केली. सायकलस्वार संभाजी बडगुजर रोज नियमितपणे दीड ते दोन तास सुमारे ४० ते ५० किमी सायकलिंग करतात. त्यांनी गेल्या एका वर्षात सुमारे १२,५०० किलोमीटर सायकलिंगचा टप्प्या पूर्ण केला.

            सायकलिंग हा एक उत्तम प्रकारचा सर्वांगीण व्यायाम आहे. नियमित सायकल चालवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होऊन हृदयविकार होण्याचा धोका ५०% कमी होतो. तसेच कॅन्सर सारखा दुर्धर आजार होण्याचे प्रमाण कमी होते. निद्रानाश, लठ्ठपणा यावर ही मात करता येते. सायकल चालवल्याने पर्यावरण संरक्षण व इंधनाची भरपूर प्रमाणात बचत होते.

             संभाजी बडगुजर यांनी यापूर्वी देखील सायकलिंग बाबतीत जनजागृती साठी विविध सायकल रॅलीचे आयोजन व यशस्वी भाग घेतला आहे. *'Pedal for a better Tomorrow'* ही संकल्पना ते स्वतः आणि त्यांच्या दोन्ही मुली देखील रोज सायकलिंग करून राबवित असून जनजागृती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

6 Comments

  1. Sir
    I want to contact with you on mobile. Do please give me your mobile number to contact with you.
    I am from Jalgaon. My name is Dinkar Narayan Badgujar.
    Yours
    Dinkar

  2. श्री संभाजी सर
    आपले अभिनंदन!
    खुप छान खेळ, व्यायाम उपक्रम.
    /
    डॉ दिलीप बडगुजर अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*