कै. परशुराम दगडू बडगुजर, अमळनेर म्हणजे माझे सासरे – आण्णा. एक सार्थ जीवन.
( जन्म : ८/३/१९३९
मृत्यू : १६/९/२०२१)
तशी त्यांच्या जीवनाची सुरुवात म्हणजे लहानपणीच मातृ-पितृ छत्र हरपल्याने अत्यंत कठीण परिस्थितीत झाली. पण काही मायेच्या आधाराने मामा श्री. गुलाब मोतीराम व इतर आप्त मित्र यांच्या मदतीने तशाही परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची जिद्द कायम ठेवली. कालांतराने त्यांच्या या प्रयत्नांना सौभाग्यवती सुमनबाईंची तेवढीच तोलामोलाची साथ लाभली. वंशवेलीला लाभलेल्या ४ अपत्यांना सुसंस्कृत करुन योग्य शिक्षण दिले. आपल्या सदाचार वृत्तीने दोनही मुलींचे सौ.सुनंदा राजेंद्र कोतवाल ह. मु. जळगाव व विजया कैलास बडगुजर ह. मु. टिटवाळा असे विवाह यथोचित प्रकारे योग्य कालावधीत झाले. पण अजूनही कष्ट संपले नव्हते. प्रताप मिलमध्ये काम करत तुटपुंज्या मिळकतीवर काटकसरीने, कष्टाने, जिद्दीने हा प्रवास यशस्वीपणे पार पाडला. अर्थात यासाठी गुणी मुलं, कैलास व पांडुरंग यांनी सुध्दा अनुकूल साथ दिली. योग्य शिक्षण पूर्ण करुन आपल्या परीने वडीलांच्या/अण्णांच्या प्रयत्नांना साथ देण्यास सुरुवात केली. यथावकाश दोन्ही मुलांच्या विवाहानंतर दुधात साखर पडावी त्याप्रमाणे आण्णांच्या आयुष्यात सुखाने प्रवेश केला. दोन्ही सुनांनी – सौ.मनिषा व सौ. अर्चना यांनीसुद्धा त्यांच्या आनंदात भर घातली. नात-नातूंच्या गोतावळ्यात आण्णांनी सुखी जीवनाचा अनुभव घेतला. त्यांचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर सतत दिसत असे.
नोकरी करताना विविध अनुभव घेत दोन्ही भाऊ आता सध्या पुण्यात स्थायिक झाले आहेत. पण हे सर्व एकीकडे होत असताना वयोमानानुसार आण्णा काही शारीरिक व्याधींनी त्रस्त झाले. अनेक योग्य उपचार करून त्यांची आता पर्यंतची वाटचाल सुखरूप होण्यासाठी सर्वांनी सर्व प्रयत्न केले. त्यामुळे आण्णा सर्वथा तृप्त असत. प्राप्त परिस्थितीत ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे आण्णांनी विजय मिळवला. सर्व खरं असेल तरी मानवाला मृत्यूवर विजय मिळवता आला नाही हे अंतिम सत्य आहे. कालानुक्रमाने १६/९/२०२१ ला ईश्वरी ईच्छा प्रबळ ठरली, कै. परशुरामशेठ आपला सर्व गोतावळा मागे ठेवून स्वर्गवासी झाले. निर्माण झालेली पोकळी भरुन निघेल अशी नाही. पण आण्णांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा, हीच सर्वांची मनोकामना! आणि त्यांना शब्दसुमनांची हीच श्रध्दांजली 💐💐💐🙏🙏🙏🙏
शोकाकुल :
कैलास परशुराम बडगुजर
सौ. मनिषा, तनिष्का, जय
पांडुरंग परशुराम बडगुजर
सौ. अर्चना, श्रुती, स्वरा व
समस्त नंदवे परिवार आणि
राजेंद्र काशिनाथ कोतवाल
सौ. सुनंदा, सुदर्शन, मोक्षदा
कैलास भाऊलाल बडगुजर
सौ. विजया, राहुल, दर्शना
कै.श्री. परशुराम दगडूशेठ बडगुजर ( अमळनेर )
यांना भावपूर्ण श्रध्दांजली !