जळगांव येथील पो. हे. कॉ. श्री. पंकज तात्याबा बडगुजर यांच्या पत्नी व श्री. सुरेश लक्ष्मण बडगुजर व सौ. मालती सुरेश बडगुजर रा.यावल यांची मुलगी आहे. सौ.सोनाली बडगुजर (उपशिक्षिका कै. सौ. ज.प्र.कुलकर्णी विद्यामंदिर जळगांव) यांना श्री स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विद्यार्थी हिताचे विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवले . यात “माझा जिल्हा माझा उपक्रम “या पुस्तकात आरोग्य व आहार या उपक्रमातून विद्यार्थिनींना आजारापासून लढण्याची विविध माहिती देऊन ऑनलाइन विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करून शिक्षण प्रवाहात कायम ठेवले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शिक्षक दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. सोनाली ताई यांनी शाळेत नवनवीन उपक्रम राबवून विध्यार्थी मध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
सौ. सोनाली ताईचे युवक समिती, बडगुजर डॉट इन व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन 🌷🌷
Wish you heartily congratulations sonali mam.