पिंपरखेड येथे श्री. चामुंडा माता मंदिराच्या कळस निधी दान सोहळा संपन्न – चि. रोहित बडगुजर धरणगांव

आज पिंपरखेड (ता. भडगाव, जि.जळगाव) येथे आज श्रीचामुंडा माता मंदिराच्या कळस निधीसाठी पिंपरखेड बडगुजर समाज मंडळ व पिंपरखेड ग्रामपंचायत च्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कळस निधी जमा करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता.
दीपप्रज्वलन प्रतिमापूजन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. या वेळी समाजातील श्री. सुरेश महाले अध्यक्ष बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ, श्री. प्रकाश धुडकू बडगुजर शिक्षण समिती प्रमुख जळगाव, श्री. विकास पुंडलीक बडगुजर सदस्य बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव, श्री .लिलाधर दत्तात्रय बडगुजर अध्यक्ष बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव तसेच या प्रसंगी पिंपरखेड बडगुजर समाज अध्यक्ष भरत बडगुजर ग्रा.पं. सरपंच अजय महाजन उपसरपंच सौ. वंदनाताई बडगुजर ग्रा.पं. सदस्य रेखाबाई गिरणार सुनील बडगुजर, प्रल्हाद बडगुजर, आत्माराम बडगुजर, सुरेश बडगुजर, मनोहर गिरणार, बडगुजर समाज युवक मंडळ पिंपरखेड, पारेश्वर भजनी मंडळी पिंपरखेड व ग्रामस्थ मंडळी पिंपरखेड उपस्थित होते.


पिंपरखेड गावात चामुंडा माता देवीच्या मंदिराच्या बांधकाम व कळस निधी दान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते, श्री.सुरेश महाले बडगुजर यांनी मंदिरासाठी आधी ११,०००/- व नंतर २१,०००/- रूपये देणगी स्वरूपात दिले तसेच जळगांव येथील सामाजिक कार्यकर्ते, श्री.प्रकाश धुडकू बडगुजर – यांनी आधी ५०००/- रूपये देणगी दिली व आता मंदिराच्या ट्रस्टीच्या मतानुसार ठरविलेली घंटा दिली, श्री.विकास पुंडलिक बडगुजर, – ११,०००/- रूपये, श्री.लिलाधर दत्तात्रय बडगुजर – २१००/- रूपये मंदिर कळस दान निधी साठी देणगी म्हणून दिले. त्याबद्दल त्याचे सर्व पिंपरखेड समाजबांधव यांनी आभार मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*