वृध्दाश्रम :- कवी – निंबा पुना बडगुजर, एरंडोल

वृध्दाश्रम

आजकाल सर्वदूर ऐकू येतो सूर,
आईवडिलांना पोठवतात वृद्धाश्रमात दूर ।

मुलांसाठी नवस सर्वच जण करतात,
सूनबाई आल्यावर अडगळ हे ठरतात ।

हाताचे फोडासमान रात्रंदिन जपतात,
अर्धपोटी राहून सज्ञान ते करतात ।

पंचविशी पर्यंत मुलगा आपला ती राहतो,
पंचवीस महिन्यातच स्वप्ने वेगळी पाहती।

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,
माता पिताय नमः ही केवळ ललकारी।

तुझे आहे तुज पाशी का राहता ऊपाशी,
माना त्यातच खुशी, पैसा ठेवा स्वतःपाशी।

अपवाद याला काही सुशील मुले व सुना,
निगर्वी प्रेमळ नम्र यांना आपलेच म्हणा

कामापुरता मामा हे ठरतील जर अपात्र,
मुलांपेक्षा मुलगी बरी द्या करून मृत्यूपत्र।

जवान नातवांना ह्या, सर्व गोष्टी कळतात,
सुईमागे दोरा तसे, ते त्यांना छळतात ।

करणी तशीच भरणी जे होईल ते पाहू, स्वतंत्रतेचे गीत गाऊ, सदा आनंदित राहू।

कवी – निंबा पुना बडगुजर

प्लॉट नं. ३३, साईनगर

एरंडोल जि. जळगांव-४२५१०९

मो. ९६३७०७९६८८

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*