थेंब.
आभाळ गळतयं
आसवं ढाळतयं
थेंब आसवाचा
धरित्री फुलवतयं
थेंबाथेंबातूनी
पिक हे फुलतयं
दाणादाणा एक
कणसात भरतयं
थेंबा-थेंबातूनी
झरे हे वाहती
निर्झर वनात
पालवी फुलवती
थेंब आसवाचा
आईच्या मायेचा
वेडा जीव लावतयं
एक जीवन फुलवतयं
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265
Leave a Reply