पाऊस :- श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

पाऊस हा असा कसा ?

थेंबाथेंबाचा

स्क्त शेतकऱ्याचे

थेंबाथेंबाने पिणारा

पाऊस हा असा कसा ?

बिनभरवशाचा

कष्टकऱ्याचा

जीव घेणारा

पाऊस हा असा कसा ?

धसमुसळा

वाटेल तिथे

जाऊ कोसळणारा

पाऊस हा असा कसा ?

आडदांड

पिक-पाण्याचे

नुकसान करणारा

पाऊस हा असा कसा ?

लहरी

जातो कधीही

आणि कधीही येणारा

पाऊस हा असा कसा ?

जीवन देणारा

पण कधी कधी

जीव घेणाराही

पाऊस हा असा कसा ?

रिमझिम
मनाचे अंगण
ओलेचिंब करणारा

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*