कळंबोली, नवी मुंबई येथे राहणारे व मुळगाव गांधली पिळोदा, ता. अमळनेर येथील कै. पितांबर सखाराम बडगुजर व गं.भा.सुशीलाबाई पितांबर बडगुजर यांचे चिरंजीव श्री. विजयकुमार पितांबर बडगुजर यांची आज दि. ३० जुन २०२४ रोजी 34 वर्षे प्रदिर्ग सेवेनंतर के . आ बांठिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाल उच्च माध्यमिक विद्यालय., नवीन पनवेल येथून सहा. शिक्षक या पदावरून सेवानिवृत्ती होत आहे. त्यांचा सन्मान समारोह उपरोक्त शाळेत काल पार पडला.
श्री. विजयशेठ यांचा जन्म दि . 09 जुने १९६६ रोजी साकळी येथे झाला. त्यांनी पिळोदा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून, पुढे सन १९८७ दरम्यान अमळनेर येथील प्रताप काॅलेज, अमळनेर मधून बी.एस्सी. चे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर आंबापिप्रि येथे चार वर्ष मुख्याध्यापक या पदावर नोकरी केली. पुढे त्यांनी पनवेल येथे तीस वर्ष सहा.शिक्षक या पदावर नोकरी केली.
त्यांचे सन १७ मे १९९७ मध्ये चोपडा येथील सौ. सोनाली पठार यांच्याशी लग्न झाले. त्यांची मोठी मुलगी चिन्मया विजय बडगुजर चिन्मया हि सध्या एम. एस. सी. चे शिक्षण घेत असून ती एक उत्तम योग शिक्षिका देखील आहे. त्यांचा चिरंजीव पियुष हा सध्या एव्हिएशन (पायलट) चे शिक्षण घेत आहे.
श्री. विजय सर यांच्या पाठीशी कै. पितांबर सखाराम बडगुजर व गं.भा.सुशीलाबाई पितांबर बडगुजर तसेच सासरे कै. पंढीरीनाथ नाटु पठार व गं. भा. सुमनबाई, चोपडा यांचे आशीर्वाद आहेत.
दोन बहीणी व दोन भाऊ असे चार भावंडे मोठी बहीण कै. विजयाबाई सुरेश बडगुजर, मेहुणे श्री. सुरेश मगन बडगुजर अ.भा.बडगुजर समाज महा समिती माजी अध्यक्ष, मा. नगरसेवक चोपडा. मोठे भाऊ श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर सेवानिवृत्त शिक्षक, ऐरोली, लहान बहीण सौ. मनिषा संजय बडगुजर,व मेहुणे श्री.संजय सुकलाल बडगुजर पिंपरखेड ता.भडगांव.असा एकंदरीत परिवार आहे. श्री. विजय सर स्वभावाने शांत व मनमिळावू आहेत, त्यांना विविध कला क्षेत्रात आवड असून, गायनात व खेळात विशेष आवड आहे. विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे त्यांना आवडते. निवृत्ती नंतर कळंबोली नवी मुंबई येथे त्यांचे वास्तव्य असणार आहे. शुभेच्छांसाठी आपण 9892790394 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
गरीब कुटुंबातून पुढे आलेले व स्वकर्तृत्वावर आजपर्यंत मजल मारलेले श्री. विजय सर यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त यांचे बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल आणि कोंकण परिसर, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप यांच्या कडून भावी वाटचालीस शुभेच्छा!
Leave a Reply