नवी मुंबई बडगुजर समाज मंडळातर्फे महिला दिन व स्नेह मेळावा निसर्ग रम्य वातावरणात साजरा

बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल व कोकण परिसर यांच्या वतीने “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून रविवार १० मार्च २०२४ रोजी स्नेह मेळावा व  विविध कार्यक्रमांचे आयोजन  निसर्ग रम्य वातावरणात निर्मिती फार्म हाऊस, पनवेल येथे करण्यात आले. 

स्नेह मेळाव्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये चित्रकला आणि वेशभूषा तर महिलांसाठी विविध गुण दर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. यात परफेक्ट मॅचिंग, पाककृती, अहिराणीमधील प्रभोधन नाट्य तसेच जोडप्यांसाठी कराओके चे देखील आयोजन होते. 
नवी मुंबई आणि कोकण परीसारतील दिडशेच्या वर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महिलानी केले तर आयोजनात पुरुषांनी हातभार लावला. प्रत्येक स्पर्धा रंगतदार झाली यात प्रत्येकाला आपले कौशल्य दाखवण्याची संधि मिळाली. 

या कार्यक्रमत समाजबांधवांनी उत्कृष्ट शाकाहारी आणि मांसाहारी मेजवानी तयार केली.  यात कोकणची खासीआयत असलेली बांभूर्डी  च्या पाल्यासोबत – शेंगा, अंडी, मका, चिकन किंवा पनीर टाकून बनविलेली मातीच्या मडक्यातील पोपटी हि विशेष होती.
विविध स्पर्धेतील विजयाचे मानकरी:

परफेक्ट मैचिंग जोडी
१. प्रथम क्रमांक – दीपाली आकाश पचलोड आणि ज्योती राकेश भिलमाळ२. द्वितीय क्रमांक – संगीता भगवान बडगुजर आणि प्रतिभा विलास बडगुजर३. तृतीय क्रमांक – प्राजक्ता नरेंद्र बडगुजर आणि जयश्री संतोष बडगुजर४. उतेजनार्थ – वंदना मदन बडगुजर आणि संगीता प्रकाश मानेवाल

पाककला स्पर्धेचे विजेते
१. पहिले बक्षीस नीलिमा राजेंद्र बडगुजर२. दुसरे बक्षीस रिया राहुल पवार३. तिसरे बक्षीस नीलिमा मनोज बडगुजर

चित्रकला स्पर्धा
१.  प्रथम क्रमांक   : सार्थकी किशोर बडगुजर२. द्वितीय क्रमांक: नक्षत्रा ईश्वर रघुवंशी३. तृतीय क्रमांक  : वंशदीप आकाश पचलोड 

फॅन्सी ड्रेस विजेते
प्रथम – नक्षत्रा ईश्वर रघुवंशी
द्वितीय – कृष्णा ललित बडगुजर 

कार्यक्रमाचे नियोजन – सौ. वंदना मदन बडगुजर, सौ. नीलिमा मनोज बडगुजर, सौ. माया देविदास बडगुजर, सौ. गायत्री गणेश बडगुजर , सौ. वीणा अविनाश बडगुजर,
तर कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई बडगुजर समाज अध्यक्ष श्री. अविनाश बडगुजर, सचिव ; दिनेश बडगुजर, खजीनदार : श्री महेंद्र बडगुजर, सदस्य श्री. आकाश पचलोड, अतुल रामसे, श्री. विलास लक्ष्मण बडगुजर तसेच मार्गदर्शन श्री. भगवान डोंगर बडगुजर (सर), श्री मदन बडगुजर यांनी केले.             

एकीकडे हिरवळीवर बसून भोजनाचा आनंद तर दुसरीकडे सुमधुर संगीताची मैफिल जमली होती. हा कार्यक्रम संपूच नये आशा भावना व्यक्त होत होत्या. लहान मोठ्या सर्व उपस्थितांनी  या कार्यक्रमाच आनंद लुटला.  

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*