शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळ हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न – श्री. घनश्याम बडगुजर, अमळनेर

शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळ हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न दि. 22/1/2022 रविवार रोजी शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळ आयोजित महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमासठी प्रमुख पाहणे शिरपूर शहर नगरपालिका माजी नगराध्यक्ष मा.सौ. संगिताताई देवरे , शहर पोलीस निरीक्षक सौ. छाया पाटील, सावित्रीताई कन्या माध्यमिक महाविद्यालय प्राचार्या मा. सौ. सारीकाताई रंधे , बोराडी ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. विद्याताई रंधे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात चामुंडा मातेच्या प्रतिमा पुजन करून दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार कार्यक्रम करण्यात आला.त्यानंतर डाॅ. सौ. वृषाली बडगुजर यांनी प्रास्ताविकातून हळदी कुंकू आणि स्री यांच्यातील संबंध स्पष्ट करुन हळदी कुंकू कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषणात सर्वप्रथम मा. सौ. संगिताताई देवरे यांनी महिलांनी संघटीत होऊन समाजासाठी कार्यक्रम आयोजित करावेत हे स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक सौ. छाया पाटील यांनी महिलांवर / मुलींवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कसे सामोरे जावे हे उदाहरणासह स्पष्ट केले. त्यानंतर मा. सौ. सारीकाताई रंधे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांची उदा. देउन प्रत्येक महिला कशी सक्षम आहे, हे स्पष्ट करुन समाजातील सक्षम स्री जागृत करण्याचा प्रयत्न आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केला. त्यानंतर मा. सौ.विद्याताई रंधे यांनी समाजातील महिलांनी एकत्र येउन समाजासाठी विविध कार्यक्रम आयोजित करावेत व समाजजागृती करावी हे स्पष्ट केले. तद्नंतर महिलांसाठी मनोरंजक कार्यक्रम उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत महिलांनी विविध उखाणे सादर केले. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. योगिता मयूर बडगुजर, व्दितीय क्रमांक सौ.ज्योती धनराज बडगुजर आणि तृतीय क्रमांक समाजातील ज्येष्ठ महिला सौ. कलाबाई बडगुजर यांनी पटकविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगिता बडगुजर व श्रीमती. प्रतिभा बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. वैजयंताताई बडगुजर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मंडळ कार्याध्यक्ष सौ. ज्योती बडगुजर व मंडळातील सर्व सदस्य महिला भगिनी यांनी परीश्रम घेतले.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*